
मोहोळ : माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवली आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. ज्यांचे पूर्वीचे काम चांगले आहे त्यांचा पुन्हा विचार केला जाईल. नागरिकांच्या अडचणी सोडविण्या बाबत पुन्हा जनता दरबार सुरू करण्यात येणार आहे. येथे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद या निवडणुकात कार्यकर्त्याचा उत्साह टिकवून ठेवणे माझे काम आहे. लवकरच नव्याने कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. ज्यांनी डीसीसी बँक बुडविली त्यांनी त्यांच्या मुलांना संधी देण्याचा घाट घातला आहे, हे चालू देणार नाही. गावोगावच्या सहकारी सोसायट्या व त्यातील कर्मचारी हे नेत्यांच्या गुलामगिरीत आहेत. त्यात पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले.