Pinjara lavani Kala Kendra
sakal
येरमाळा - धाराशिव तालुक्यातील आळणी येथील बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना देण्यात आलेला 'पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र'चा परवाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी रद्द केला आहे. पोलिसांनी कला केंद्रावर टाकलेल्या धाडीत अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने परवाना तात्काळ रद्द करण्यात आला.