
सोलापूर : दहा किंवा त्याहून कमी पटाच्या शाळांवर पूर्ण पगारीच्या शिक्षकांऐवजी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय नव्या सरकारने रद्द केला. तरीपण, पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेल्या कमी पटाच्या (१० पेक्षा कमी) शाळांवर आता एकच शिक्षक असणार आहे. सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या अशा ६३ शाळांवरील एकपेक्षा जास्त असलेले शिक्षक दुसऱ्या शाळेत नेमले आहेत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या मुलांना एकाच वर्गात बसवले जणार आहे.