राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांच्या विधायक कार्याची राज्यस्तरावर दखल

 District President Anita Nagne
District President Anita Nagne

मंगळवेढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षीय पातळीवर उल्लेखणीय काम केलेल्या जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांनी वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाची राज्यपातळीवर खा. सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

निवडणुकीपूर्वी जिल्हाध्यक्ष पदी संधी दिल्यानंतर स्वतःच्या तालुक्यात मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर समवेत अत्याचारीत मुलीच्या कुटूंबाला धीर दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ई डी ने नोटीस दिल्यानंतर त्या विरोधात पंढरपूर व मुंबई येथे ई डीच्या कार्यालयासमोर जिल्ह्यातील महिलांसोबत समवेत आंदोलन केले तर विधानसभेचे रणशिंग पवारांनी सोलापूरात फुंकले. या दौर्‍यात २५० महिला जिल्हाभरातून सहभागी केल्या. पिवळे रेशन कार्ड मिळावे म्हणून महिला समवेत निवेदन दिले. 

महिला संघटन व महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी, महिला दक्षता समित्या नेमणे, विशाखा समित्या नेमणे, याबाबत पाठपुरावा केला. संक्रांतीनिमित्त महिलांसाठी वसा आरोग्याचा वाढ विचारांचा हा कार्यक्रम घेतला. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनी, महिला, गरोदर मातांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. मंगळवेढ्यातील प्रभाग एक मध्ये 200 गरीब कुटुंबांना जीवनाश्यक साहित्याचे किट व 2500 मास्क वाटप करण्यात आले. काॅरंटाईन केलेल्या महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले. पक्षाच्या वर्धापन दिनी मर्दानी महाराष्ट्राचे या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कोविड १९ योध्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

स्वखर्चातून अर्धा लिटरच्या दोन हजार सॅनिटायझरच्या बॉटल्या, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांना सॅनिटायझर बॉटल्स मास्टर व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. खा. सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी महिलांना मास्क व फुल देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रभर घेण्यात आलेल्या अभिप्राय नोंदणी उपक्रमात जिल्ह्यातील शहर व तालुकाध्यक्ष इतर पदाधिकारी महिलांच्या संपर्कातून अभिप्राय नोंदणीत जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात पाचवा क्रमांक आला.

राज्यामध्ये जरी आघाडी सरकार असले तरी आमदारांची संख्या 54 आहे. हीच संख्या आगामी 2024 मध्ये सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे व्हावेत. यासाठी आतापासूनच बुथ बांधणीचे नियोजन केले. सांगोल्यामधील प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांच्या प्रयत्नातून रोल मॉडेल म्हणून नावारूपास आणले. या विविध उपक्रमामुळे जिल्हाध्यक्षा अनिता नागणेच्या कार्याची राज्यस्थरावर दखल घेतली.


संपादन - सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com