
सोलापूर : इयत्ता बारावीची परीक्षा यावर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होणार आहे. यंदा जिल्ह्यातून बारावीसाठी ५५ हजार ८७९ तर दहावीसाठी ६५ हजार ५८५ इतके विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. केंद्रांसाठी केंद्रसंचालक नियुक्त करण्यात आलेले असून जिल्ह्यात बारावीसाठी ३४ तर इयत्ता दहावीसाठी ४७ संवेदनशील केंद्रे आहेत.