
सोलापूर : पाचवी आणि आठवीच्या वर्गात गेल्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा सोपी जावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून सेस फंडातून इयत्ता चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांची प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. रविवारी जिल्ह्यातील चौथी व सातवीतील नऊ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जिल्हा परिषदेतील नियंत्रण कक्षातून (कंट्रोल रुम) प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी परीक्षेच्या हालचालींवर लक्ष ठेवले. कोणत्याही गैरप्रकाराशिवाय परीक्षा सुरळीत पार पडल्याचे त्यांनी सांगितले.