
अशातच कोरोनाचा सामना करताना नाकीनऊ आले. कोरोनाने मरण्यापेक्षा आरक्षणाची लढाई लढून मरू,आरक्षण मिळण्यासंदर्भात मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून सरकारला समाजाची तिव्रता दाखवली.
मराठा आरक्षण : आजचा निकाल हे केंद्र व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचं पाप !
मंगळवेढा (सोलापूर) : मराठा समाजाकरिता (Maratha reservation)देण्यात आलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून आज रद्द करण्यात आले. मराठा आरक्षण रद्द ही दुर्दैवी बाब. पण याचे गंभीर परिणाम समाजात दिसतील. आजचा निकाल हे केंद्र आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या अपयशाचे पाप आहे. मराठा समाज हे कदापि सहन करणार नाही. आरक्षणासाठी लवकरच पुढील दिशा ठरवू, असा इशारा सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौडूभैरी (Dnyaneshwar Kaudubhairi) यांनी दिला. (Dnyaneshwar Kaudubhairi has said that cancellation of maratha reservation is an unfortunate matter)
हेही वाचा: सोलापूर शहरात 2, 8 आणि 9 मे रोजी कडक संचारबंदी
मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन लढाईत सरकारला अपयश आले. इतर कोणत्याही राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण नाही ही बाब विचारात घेतल्यामुळे आरक्षणाच्या आधारावर भविष्यात नोकरी व अन्य माध्यमातून आपले करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे. अशातच कोरोनाचा सामना करताना नाकीनऊ आले. कोरोनाने मरण्यापेक्षा आरक्षणाची लढाई लढून मरू,आरक्षण मिळण्यासंदर्भात मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून सरकारला समाजाची तिव्रता दाखवली. परंतु हे आंदोलन शांततामय मार्गाने होते परंतु आता मराठा समाजाच्या शांततेचा कडेलोट होत आहे.
आरक्षण आमच्या हक्काचं नाही. कोणाच्या बापाचं या पुढील असंतोष व उद्रेकासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार जबादार राहील, आरक्षणाचा मार्ग त्वरित निघावा या करिता आता मराठा समाज जो मार्ग अवलंबवेल त्याचे परिणाम भोगण्यास तयारी ठेवा. असा इशारा देखील अध्यक्ष कौडूभैरी यांनी दोन्ही सरकारला देत सध्याच्या काळातील शिक्षण हे महाग झाले आहे. त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना कमी खर्चात शिक्षण व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. (Dnyaneshwar Kaudubhairi has said that cancellation of maratha reservation is an unfortunate matter)
Web Title: Dnyaneshwar Kaudubhairi Has Said That Cancellation Of Maratha Reservation Is An Unfortunate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..