
सोलापूर : तळे हिप्परगा येथील डॉ. नितीन दत्तात्रय माने देशमुख (वय ४८) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली. बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचाही अंदाज पोलिसांनी वर्तविला असून उत्तरीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर नेमका प्रकार समोर येईल, असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.