Married woman ends life after domestic harassment; husband arrested.
Woman Dies by Suicide, Husband Arrestedesakal

Solapur Suicide Case : 'विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन'; पती, सासु सासऱ्याकडून छळ, पतीला अटक

Married Woman Dies by Suicide Due to Harassment : आशाराणी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आशा राणीचा नवरा, सासू व सासरा यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पवन भोसले(पती) अलका बलभीम भोसले(सासु) बलभीम चंद्रभान भोसले(सासरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Published on

-राजकुमार शहा

मोहोळ : तुला स्वयंपाक येत नाही, चार चाकी घेण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये, तू नवऱ्याची इज्जत करत नाही अशा त्रासाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने घराच्या चौकटीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोली-काटी ता मोहोळ येथे 3 जून रोजी दुपारी 12.45 वाजता घडली. आशाराणी पवन भोसले असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान आशाराणी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आशा राणीचा नवरा, सासू व सासरा यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पवन भोसले(पती) अलका बलभीम भोसले(सासु) बलभीम चंद्रभान भोसले(सासरा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com