युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी डोंगरे तर जिल्हाध्यक्षपदी सुनंजय पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress
युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी डोंगरे तर जिल्हाध्यक्षपदी सुनंजय पवार

युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदी डोंगरे तर जिल्हाध्यक्षपदी सुनंजय पवार

सोलापूर : कॉंग्रेसच्या युवक अध्यक्षपदी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांची निवड झाली आहे. ऑनलाइन सभासद नोंदणीत ते अव्वल ठरले आहेत. 12 जणांच्या शर्यतीत अव्वल राहून त्यांनी हे पद मिळविले आहे. तर युवक जिल्हाध्यक्ष म्हणून पंढरपूरचे सुनंजय पवार यांनी बाजी मारली.

हेही वाचा: चिमुकल्यांना पोरकं करणारा, नातेसंबंध विसरायला लावणारा कोरोना परतीच्या वाटेवर

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी अंबादास करगुळे यांनी युवक अध्यक्ष म्हणून काम करताना कॉंग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डोंगरे याना त्याठिकाणी संधी मिळाली आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठीने राज्यातील अनेक जिल्ह्यात युवक अध्यक्षांच्या नव्याने निवडी केल्या आहेत. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने सभासद नोंदणीचा निकष लावण्यात आला होता. डोंगरे यांनी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्‍नांवर विद्यापीठाला जाब विचारला. वेळप्रसंगी त्यांनी आंदोलनेही केली. डोंगरे हेच युवक अध्यक्ष असणार यासंदर्भात 'सकाळ'ने यापूर्वीच वृत्त प्रकाशित केले होते. त्यानुसार डोंगरे हे दहा हजार 214 मते घेऊन त्या पदावर विराजमान झाले. ग्रामीणचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून पंढरपूरचे सुनंजय पवार यांची निवड झाली आहे. त्यांनी 10 उमेदवारांहून अधिक मते मिळविली. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: सोलापूर : महाविकास आघाडीमुळेच रखडली समांतर जलवाहिनी

11 उमेदवारांहून अधिक सभासद नोंदणी
शहर युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 12 जण इच्छूक होते. त्यात गणेश डोंगरे, विवेक कन्ना, झिशान सय्यद, सचिन वेरणेकर, आकाश गायकवाड, राजासाब शेख, अर्जुन साळवे, प्रशांत कांबळे, पवन दोडमनी, सचिन मानवी, सुशिलकुमार म्हेत्रे आणि प्रतिक आबुटे यांचा समावेश होता. साळवे यांनी तीन हजार 760 तर सय्यद यांनी एक हजार 925 मते मिळविली. उर्वरित उमेदवारांना 358 पेक्षा अधिक मते मिळाली नाहीत, हे विशेष. तर युवक जिल्हाध्यक्षपदासाठी सुनंजय पवार यांनी 16 हजार 744 मते घेतली. त्यांना निलेश गायकवाड (10,265 मते) यांनी टफ दिली.

Web Title: Dongre As The City President Of The Youth Congress And Sunanjay Pawar As The District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top