esakal | खंडोबा मंदिराचे दर्शनासाठी दरवाजे बंद ! भाविकांनी घेतले पायरीचेच दर्शन 
sakal

बोलून बातमी शोधा

IMG-20201220-WA0283 (1).jpg

कोरोनामुळे भाविकांनी करावे नियमांचे पालन 
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर, तुळजापूर येथील अंबादेवीचे मंदिर, श्री सिध्देश्‍वर मंदिरासह अन्य मंदिरे दर्शनासाठी खुली झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गशिर्ष महिन्यातील दर रविवारी मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जाणार असून भाविकांनी नियमांचे पालन करुन गर्दी न करता सोमवार ते शनिवारी दर्शनासाठी यावे. 
- गणेश पुजारी, मानकरी तथा नगरसेवक

खंडोबा मंदिराचे दर्शनासाठी दरवाजे बंद ! भाविकांनी घेतले पायरीचेच दर्शन 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आल्याने आणि कोरोनाचे संकट अद्यापही दूर न झाल्याने प्रशासनाने बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मार्गशिर्ष महिन्यातील चार रविवारी खंडोबाची यात्रा भरते. परंतु, रविवारी यात्रेस भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मंदिराचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे भाविक पायरीचेच दर्शन घेऊन परत जात आहेत. 

कोरोनामुळे भाविकांनी करावे नियमांचे पालन 
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर, तुळजापूर येथील अंबादेवीचे मंदिर, श्री सिध्देश्‍वर मंदिरासह अन्य मंदिरे दर्शनासाठी खुली झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाळे येथील श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मार्गशिर्ष महिन्यातील दर रविवारी मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जाणार असून भाविकांनी नियमांचे पालन करुन गर्दी न करता सोमवार ते शनिवारी दर्शनासाठी यावे. 
- गणेश पुजारी, मानकरी तथा नगरसेवक 

दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यातील श्री क्षेत्र खंडोबाच्या यात्रेस महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. 20, 27 डिसेंबर आणि 3 आणि 10 जानेवारी या चार रविवारी खंडोबाची यात्रा भरते. या काळात महापूजा, अभिषेक, जागरण- गोंधळ, वाघ्या- मुरळी नाचणे, तळी भंडार उचलणे, वारु सोडणे, नवस फेडणे व जावळ काढणे असे विविध कार्यक्रम होतात. यात्रेत तोडकरी, पाटील, कांबळे, सुरवसे व गावडे हे मानकरी आहेत. त्यांना पारंपारिक विधी करण्यास परवानगी दिली असून मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, आता यात्रेनिमित्त हजारो भाविक कुटुंबियांसह बाळे येथे येत आहेत. परंतु, मंदिर बंद असल्याने मंदिराबाहेर ठेवलेल्या प्रतिमेचे दर्शन घेऊन परत जात आहेत. यात्रा संपेपर्यंत मंदिराचे दरवाजे दर रविवारी आता बंद ठेवले जाणार आहेत. दुसरीकडे सोमवार ते शनिवारी मंदिराचे दरवाजे सुरु राहणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. तर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन तंतोतंत करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन मंदिराच्या मानकऱ्यांनी केले आहे.

loading image