

State Election Commission’s dual counting decision triggers anxiety among municipal election candidates.
Sakal
-प्रमोद बोडके
सोलापूर : एकाच नगरपरिषद/नगरपंचायतीत दोन टप्प्यात मतदान आणि मतमोजणी होणार आहे. त्यामुळे एका निकालाचा प्रभाव दुसऱ्या निकालावर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत छाननीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जिल्हा न्यायालयात अपिल दाखल झाले होते. ज्या अपिलांचा निकाल २२ नोव्हेंबरच्या आत मिळाला नाही, अशा नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीचा दुसरा टप्पा केला आहे.