

Dr Gauri Anurath Zhol
ESakal
काही यशकथा केवळ पदवी मिळवण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या माणसांच्या कष्टांना अर्थ देतात, संघर्षाला प्रतिष्ठा देतात आणि स्वप्नांना पंख देतात. डॉ. गौरी अनुरथ झोळ यांचा वैद्यकीय प्रवास अशीच मनाला खोलवर स्पर्शून जाणारी कहाणी आहे. कष्ट आणि प्रचंड स्पर्धात्मक असलेल्या एम. डी. डर्मेटोलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची झालेली निवड ही केवळ वैयक्तिक यशाची नव्हे, तर शेतकरी कुटुंबाच्या न बोलता जपलेल्या असंख्य स्वप्नांची पूर्तता आहे.