
सोलापूर : सन १९९२ मध्ये सोलापुरात अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषद संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्षपद भूषविले विख्यात खगोल वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांनी. शहरातील एकमेव स्व. नागेश धायगुडे विज्ञान व्याख्यानमालेची सुरुवातही त्यांच्याच व्याख्यानाने झाली. सोलापुरात विज्ञान चळवळ रुजवण्याच्या कार्यात डॉ. नारळीकर हे मनापासून सहभागी होते, अशा आठवणी येथील विज्ञान चळवळीतील कार्यकर्त्यांनी जागवल्या.