
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी (ता. १७) उद्योगवर्धिनी संस्थेस सदिच्छा भेट दिली. शून्यातून विश्व उभारलेल्या उद्योगवर्धिनीच्या कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेतली. महिला सक्षमीकरणाच्या या प्रकल्पाचे कौतुक केले. महिलांचा आर्थिक पाया भक्कम होणे आवश्यक आहे. आर्थिक स्वावलंबनासह येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधा, असे आवाहन उपस्थित महिला भगिनींना केले.