
सोलापूर : येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिलला आत्महत्या केली. त्यावेळी त्यांच्या खिशातील सुसाईड नोटवरून रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे- माने यांना अटक झाली. दोन महिन्यांनंतर मनीषा यांना जामीन मिळाला. सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, आता डॉ. उमा वळसंगकर यांनी मनीषाविरुद्ध आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे सदर बझार पोलिसांकडे केली आहे.