
सोलापूर : न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पण, डॉक्टरांना मनीषाशिवाय अन्य कोणाचा त्रास होता का?, त्यांना आत्महत्येच्या आणि आदल्या दिवशी कोणाकोणाचे कॉल आले होते किंवा त्यांनी कोणाला कॉल केले होते?, यासंदर्भातील माहिती ‘सीडीआर’मधूनच बाहेर येईल, अशी अपेक्षा होती. पण, पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या ७२० पानांच्या दोषारोपपत्रात ‘सीडीआर’च जोडला नसल्याची बाब समोर आली आहे.