
सोलापूर : येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सदर बझार पोलिसांनी डॉ. वळसंगकरांच्या रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपणार आहे. दुसरीकडे त्यांच्या जामिनावर सरकार वकील देखील मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात म्हणणे दाखल करणार आहेत. पण, मनीषा यांच्या जामिनावरील सुनावणी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.