
सोलापूर : पोषम्मा चौक परिसरातील शंभो मारुती मंदिरासमोर दूषित पाणी येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. या तक्रारीवरून एंडोस्कोपी कॅमेराद्वारे तपासणी करण्यात आली. यात ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीच्या कुजलेल्या बेंडमधून पिण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत होते. महापालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत, ड्रेजनेचे वॉल्व्ह बसवून दुरुस्ती केली.