

ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
sakal
सोलापूर : शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये आता थेट बँकेच्या एटीएमलाच लक्ष्य करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. घरकुल परिसरातील सग्गम नगर भागात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएम केंद्रातून चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीनच उखडून नेल्याची घटना शनिवारी (१६) पहाटे तीनच्या सुमारास घडली. पोलिसांनी तपासासाठी चार विशेष पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बँकेकडून पोलिसात फिर्याद देण्यात आली नव्हती.