

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
sakal
सोलापूर: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून केंद्रीय पथकाने देखील दुष्काळाची पाहणी केली आहे. महसूल यंत्रणेने प्रत्येक शेतकऱ्याच्या तीन हेक्टरचे पंचनामे केले आहेत, पण २०२३ च्या शासन निर्णयात कोणताही बदल न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन हेक्टरचीच माहिती अपलोड केली जात आहे. विशेष बाब म्हणून राज्य सरकारने हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर केल्यास उर्वरित एका हेक्टरची माहिती तातडीने कळवता येईल, याची तयारी प्रशासनाने केली आहे.