
तुळजापूर: ड्रग्स रॅकेटप्रकरणी फरार असलेला तुळजापूरचा माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर-कदम यास रविवारी (ता. २२) रात्री उशिरा सोलापुरातून अटक करण्यात आली. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याला हादरवून सोडणारे ड्रग्ज रॅकेट प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात सोलापूरसह बार्शी, तामलवाडी, धाराशिव, तुळजापूर येथून पोलिसांनी आतापर्यंत २२ संशयितांना अटक केली आहे.