शासनाने दिले पण प्रशासनाच्या चुकीने घालवले ! नव्याने 20 टक्के अनुदानप्राप्त शिक्षकांचा निधी गेला परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

जिल्ह्यातील 20 प्राथमिक शाळेतील 90 शिक्षकांना पहिल्यांदाच 20 टक्के अनुदान प्राप्त झालेले होते. त्याचा निधीही शिक्षण विभागामध्ये आला होता. मात्र, संबंधित विभागात काम करणाऱ्या नवख्या कर्मचाऱ्यामुळे हा निधी परत गेला आहे. 

शासनाने दिले पण प्रशासनाच्या चुकीने घालवले ! नव्याने 20 टक्के अनुदानप्राप्त शिक्षकांचा निधी गेला परत

उत्तर सोलापूर : जिल्ह्यातील 20 प्राथमिक शाळेतील 90 शिक्षकांना पहिल्यांदाच 20 टक्के अनुदान प्राप्त झालेले होते. त्याचा निधीही शिक्षण विभागामध्ये आला होता. मात्र, संबंधित विभागात काम करणाऱ्या नवख्या कर्मचाऱ्यामुळे हा निधी परत गेला आहे. त्यामुळे शासनाने दिले आणि प्रशासनाने घालवले, अशी स्थिती या शिक्षकांची झाली आहे. मागील दहा- पंधरा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांमागील शुक्‍लकाष्ट अद्यापही संपले नसल्याचे यावरून स्पष्ट होते. 

निधी मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने बिले ट्रेझरीत टाकण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन पथकाला दिले. वेतन पथक अधीक्षक, लिपिक रजेवर होते. नव्याने जबाबदारी सोपवलेल्या अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याने ती बिले ट्रेझरीने त्रुटी लावून परत पाठवली आणि त्यामुळेच 20 टक्के अनुदानाचा मिळालेला निधी परत गेला आहे. संबंधित कर्मचाऱ्याकडून बिले पास करताना हेड चुकल्याने हा सगळा गोंधळ झाला आहे. 

याबाबत काही शिक्षक संघटनांनी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याशी संपर्क साधला. निधी परत जाऊ नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी निधी परत गेलाच. दहा - बारा वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण निधी परत गेल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. 

अनुदान परत मिळवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्टृ राज्य शिक्षक सेना, युवक शिक्षक कर्मचारी संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे विनोद आगलावे, मुरलीधर कडलासकर, वीरभद्र यादवाड, अ. गफूर अरब यांनी प्रयत्न केले. मात्र, हाती यश आले नाही. 
- सुनील चव्हाण, 
प्रदेश सरचिटणीस, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद 

आजच पदभार घेतला आहे. नवख्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीमुळे निधी परत गेला आहे. निधी पुन्हा मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला जाईल. 
- श्री. मिश्रा, 
अधीक्षक, वेतन पथक, प्राथमिक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Web Title: Due Mistake Administration Funds Newly Subsidized Teachers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India