esakal | कामती पोलिसांच्या तत्परतेमुळे शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटला काळवीट!
sakal

बोलून बातमी शोधा

कामती पोलिसांच्या तत्परतेमुळे शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटला काळवीट!

शिकार केलेले काळवीट दुचाकीवरून घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांनी पोलिसांना पाहताच काळविटासह दुचाकी जागेवरच सोडून धूम ठोकली.

पोलिसांच्या तत्परतेमुळे शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटला काळवीट !

sakal_logo
By
अशपाक बागवान

बेगमपूर (सोलापूर) : शिकार (Hunt) केलेला काळवीट (Antelope) दुचाकीवरून घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा शिकाऱ्यांनी (Hunters) पोलिसांना (Police) पाहताच काळविटासह दुचाकी जागेवरच सोडून धूम ठोकली. कामती पोलिसांची सतर्कता व वन विभागाचे (Forest Department) सहकार्य यामुळे एका निष्पाप वन्यजीवाचे प्राण वाचल्याची घटना दादपूर- पिरटाकळी (ता. मोहोळ) दरम्यान वनक्षेत्र विभागात घडली. या प्रकरणी दोघा अज्ञात व्यक्तींवर गुन्हा (Crime) नोंदविण्यात असून, घटनेनंतर वन विभागाने ताब्यात घेतलेल्या काळविटाला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक वातावरणात सोडून देण्यात आले.

हेही वाचा: पावसाळ्यात उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या माहीत आहेत का?

एरव्ही श्रावण महिना संपताच वन्यजीवांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या होतात. या वेळी मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे एका काळविटाचे प्राण वाचल्याने वन्यजीव प्राणी मित्रांकडून कामती पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, सोमवारी दुपारी कामती पोलिसांना दादपूर - पिरटाकळी मार्गावरील वन विभाग परिसरात एका काळविटाला दोरीने बांधून दुचाकीवरून दोघेजण घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून मिळाली.

या वेळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षण अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एम. टी. पवार, के. एन. ऊर्फ बबलू नाईकवडी, साळवे, पोलिस कॉन्स्टेबल राहुल दरेकर आदी जण तत्काळ घटनास्थळाजवळ पोचले. त्या वेळी दोघे अनोळखी इसम एमएच 13-डीआर 6348 या क्रमांकाच्या दुचाकीवर काळवीट बांधून घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना दिसले व रस्त्यावरून पोलिस वाहन समोरून येत असल्याचे त्या दोघांनी पाहिले. त्याच वेळी कारवाईच्या भीतीने त्या दोघांनी काळविटासह दुचाकी जागेवरच सोडून पळ काढला. या घटनेची माहिती तालुका वनविभागाला देण्यात आली. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे, वनपरिमंडल अधिकारी सुनील साळुंखे, वनरक्षक सुनील थोरात, वनसेवक लालू पवार आदींनी पोलिस ठाण्यात आणलेले काळवीट ताब्यात घेतले. या घटनेची कामती पोलिसांत नोंद झाली असून, पोलिस हवालदार राहुल दरेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा: गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

या काळविटाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका वन्यजीवाचे प्राण वाचले. वन्य जीवांच्या रक्षणाकरिता सर्वांचे सहकार्य आवश्‍यक आहे.

सतीश उटगे, वन परिक्षेत्र अधिकार

loading image
go to top