

Officials verifying voter lists during preparations for Solapur district council elections
Sakal
सोलापूर: नगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीत सोलापूर जिल्ह्यात ११ हजार ५१४ दुबार मतदार होते. महापालिकेसाठी १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार यादीत २३ हजार ५६३ मतदार दुबार आढळले. जिल्हा परिषदेच्या मतदार यादीत देखील तब्बल ३८ हजार ९०९ दुबार मतदार आहेत. यातील काहींनी नगरपालिकेत मतदान केले असून आता महापालिकेत आणि पुढे जिल्हा परिषदेसाठीही मतदान करतील. त्यांच्याकडून हमीपत्रे घेतली, पण ते प्रभाग, गट, गणासंदर्भातील आहेत.