परीक्षेवेळी विद्यार्थ्यांची अंगझडती नकोच

बोर्डाच्या सूचना; १८ फेब्रुवारीपासून परीक्षार्थींना मिळणार हॉल तिकीट
Study Rooms are closed students are sick  before upcoming exams
Study Rooms are closed students are sick before upcoming exams
Updated on

सोलापूर : बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सर्वप्रथम असल्याने बोर्डाकडून त्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून दिले असून १८ फेब्रुवारीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ते मिळेल. मुख्याध्यापकांकडे त्याचे लॉगिन आहे. ऑनलाइनवरून डाउनलोड करून दिलेल्या प्रवेशपत्रावर संबंधित शाळा, कॉलेजच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी व शिक्‍का बंधनकारक राहणार आहे. त्याशिवाय ते प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तर कोरोनामुळे यंदा परीक्षेवेळी विद्यार्थ्यांची अंगझडती नकोच, अशा सूचनाही बोर्डाने दिल्या आहेत.

राज्यातील ३१ लाख विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ३१ हजार परीक्षा केंद्रे असतील. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर केंद्रावर यावे लागणार आहे. परीक्षेसाठी त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढीव देण्यात आला आहे.

उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्वीप्रमाणेच केली जाणार असून परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांत कोरोनामुळे परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. जूनअखेरीस निकाल जाहीर करून १ जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने एका वर्गात दहावी-बारावीचे केवळ २५ विद्यार्थ्यांचीच बसण्याची व्यवस्था असणार आहे. तर कोणत्याही विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी केली जाणार नाही. आता प्रात्यक्षिक परीक्षेला सुरवात होईल, त्यासाठीदेखील बाह्य परीक्षक नसतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे दडपण वाढू नये, मानसिकता खचणार नाही, याची दक्षता बोर्डाकडून घेतली जात आहे.

शाळांनी यापूर्वीच उरकले प्रात्यक्षिक

कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही दहावी-बारावीचे ऑफलाइन वर्ग सुरु होते. त्यावेळी बहुतेक शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक काम उरकले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनीही तशा तोंडी सूचनाही मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मात्र, आता बोर्डाने दिलेल्या वेळापत्रकानुसार पुढे नाममात्र कार्यवाही केली जाणार आहे. दुसरीकडे ऑफलाइन शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर ऑनलाइन शिक्षण न समजल्याने बहुतेक शाळांनी सर्व अभ्यासक्रम ऑफलाइन शिकवायला सुरवात केली. आता परीक्षा काही दिवसांवर असतानाही तो अभ्यासक्रम अपूर्णच असल्याने तो उरकण्याचा धडाका सुरु असल्याचेही चित्र आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून मिळेल. दहावीच्या विद्यार्थ्यांना १८ फेब्रुवारीनंतर हॉल तिकीट उपलब्ध होतील. परंतु, त्यावर मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शाळेचा शिक्‍का गरजेचा आहे.

- शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com