अशी दिवाळी नको गं बाई! ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाईच्या झळा!

Diwali : नागरिकांचा तीव्र संताप
solapur
solapursakal

सांगोला शहरास पाणीपुरवठा करणारा पंढरपूर येथील विद्युतपंप नादुरुस्त झाल्यामुळे गेले तीन दिवस पाणीपुरवठा बंद आहे. ऐन सदासुदीच्या काळात पाणीटंचाईच्या झळा शहरवासीयांना सोसाव्या लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सांगोला शहरास पंढरपूर येथील भीमा नदीतील इसबावी येथून पाणीपुरवठा केला जातो. पंढरपूर येथील विद्युत पंपामध्ये बिघाड झाल्यामुळे सांगोला शहरातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे शहरातील होणारा पाणीपुरवठा सध्या ठप्प झाला असून सणासुदीच्या काळामध्ये शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

solapur
Solapur : आमदार खासदारापेक्षा गाव पातळीवर सरपंच व सदस्यांना काम करण्याची संधी- अभिजीत पाटील

दीपावलीच्या तोंडावरच नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंपामध्ये बिघाड झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा होणार नाही किंवा किती दिवस पाणी येणार नाही याची माहिती नागरिकांना दिली पाहिजे असे नागरिक बोलून दाखवत होते. पंढरपूरच्या पंपामध्ये बिघाड झाला की शहराला नेहमीच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी पंपाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही नागरिक करीत आहेत.

नागरिक घेताहेत विकतचे पाणी -

ऐन सणासुदीच्या काळामध्ये पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरिक टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. एक हजार लिटरच्या पाण्यासाठी 350 ते 400 रुपये तर पाच हजार लिटरची 900 ते एक हजार रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.

solapur
Solapur News : दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सरकारने लक्ष द्यावे - डॉ देशमुख

पंढरपूर येथे भीमा नदीतील उपसा करणाऱ्या विद्युत पंपामुळे बिघाड झाल्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 81 गावच्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून आता शहसास पाणी घेतले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल - डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी, सांगोला.

- पंढरपूर येथीलणपंपामध्ये बिघाड झाल्यामुळे शहरात पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु पंढरपूर येथील पंप नेहमीच बंद झाल्यास असेच नेहमी पाणीटंचाईला सामोरे जायाचे का ? प्रशासनाने नागरिकांना पाण्याची पर्यायी व्यवस्था नेहमीच तत्पर ठेवली पाहिजे - अभिजीत दौंडे, सांगोला.

solapur
Solapur News : दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सरकारने लक्ष द्यावे - डॉ देशमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com