
Solapur Dussehra
Sakal
सोलापूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स, सोने खरेदीचा जोर दिसून आला. आज दिवसभर सोलापूर शहरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. यंदाच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीचा जोर दिसून आला. आज सुमारे २००० दुचाकी व ७०० चारचाकी वाहने विकली गेली. यंदा अतिवृष्टी व महापुराचे खरेदीवर सावट असले तरी आज दिवसभरात सुमारे चारशे कोटींची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापारी व व्यावसायिकांनी व्यक्त केला.