

BJP workers expressing dissatisfaction over survey-based candidate selection and alleged favoritism.
Sakal
-विठ्ठल सुतार
सोलापूर : कथित सर्वेक्षणाचा आडोसा घेत भारतीय जनता पक्षा घराणेशाही पुढे रेटली जात आहे. अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी सौ. शांभवी कल्याणशेट्टी यांना चपळगाव तर भाऊ सागर कल्याणशेट्टी यांना वागदरी गटातून जिल्हा परिषदाची उमेदवारी दिली आहे. अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीत चुलत भाऊ मीलन कल्याणशेट्टी यांना याआधीच नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.