
बेशिस्तीचा ई-टॉयलेटला फटका
सोलापूर : पुणे, मुंबई शहराप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ई-टॉयलेट शहरात बसवले असून करोडो रुपये खर्च करून देखील नागरिकांची बेशिस्तीमुळे ही सुविधा असून नसल्यासारखी झाली आहे. मात्र, या योजनेवर लाखो रुपये खर्च वाया जाण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटी योजनेत काही वर्षापूर्वी शहरात ई-टॉयलेट योजना आणण्यात आली. नागरिकांना भर बाजारात स्वच्छतागृहाची सुविधा देण्याच्या दृष्टीने शहरातील एकूण ४० ठिकाणी ई टॉयलेट बसवण्यात आले. त्यावर लाखो रुपयांचा खर्च झाला. (e-Toilet scheme Solapur)
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
या स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागतात. दरवाजावरील यंत्रात नाणे टाकल्यानंतर दरवाजा उघडतो. तसेच त्यासोबत पाण्याचा अर्लाम होऊन स्वच्छतेसाठी पाणी देखील उपलब्ध होते. एका चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह हे स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहरात उपलब्ध करून दिले गेले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्याची स्वच्छता देखील योग्य प्रकारे राखली जाते. पण ई-टॉयलेट योजना चांगली असून त्याला नागरिकांची बेशिस्तीचा दणका बसू लागला. एकदा कॉईन टाकल्यानंतर दरवाजा उघडल्यावर दरवाज्याच्या फटीत दगड टाकून तो दरवाजा उघडाच ठेवण्याचे प्रकार केले जाऊ लागले. दरवाजाच्या यंत्रात नाणी टाकण्याच्या ऐवजी धातूची चकती टाकून उघडण्याचे प्रकार होऊ लागले. या प्रकारामुळे पाणी सोडण्याच्या साठी असलेली अर्लाम यंत्रणा बंद पडू लागली. पाणीच उपलब्ध होत नसल्याने या सुविधेचे तीनतेरा वाजले आहेत. लोकांच्या बेशिस्तीवर योजनेच्या अयशस्वीतेचा ठपका स्मार्ट सिटीकडून केला जात आहे. तरीही स्मार्ट सिटी योजनेने पाच वर्षाची देखभाल कंत्राटदारास दिली असल्याने निदान ई ’टॉयलेटची स्थिती निदान उपयोगात राहील, अशी ठेवली गेली.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
ठळक बाबी
शहरात एकूण ४० इ-टॉयलेटची उभारणी नाणी टाकून सुविधा वापरण्याची सुविधा योजनेवर लाखो रुपये खर्च पाच वर्षे देखभालीच्या अटीमुळे योजना तग धरून
नागरिकांचे कारनामे
नाणी टाकण्याऐवजी धातूची चकती यंत्रात टाकणे एकदा दरवाजा उघडला की दगड अडकवून दरवाजा कायम उघडा ठेवणे तांत्रिक बिघाड करून पाण्याची अर्लाम व्यवस्था बंद पाडणे टॉइलेट ऐवजी बाहेरच मलमूत्र विसर्जन करणे
शहरात एकूण ४० ई- टॉयलेट उभारण्यात आले आहेत. पुणे व मुंबई शहराप्रमाणे ही सुविधा व्यवस्थीत वापरली तर उपयोगी ठरू शकते. त्यासाठी नागरिकांचा शिस्तीचा प्रतिसाद हवा आहे. पाच वर्षाची देखभाल कंत्राटदाराकडे आहे.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, सीईओ स्मार्ट सिटी सोलापूर
Web Title: E Toilet Scheme Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..