'या' कारणामुळे बजावली शिक्षणाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांना नोटीस! | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक
'या' कारणामुळे बजावली शिक्षणाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांना नोटीस!

'या' कारणामुळे बजावली शिक्षणाधिकाऱ्यांनी चार शिक्षकांना नोटीस!

सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, वसुंधरा अभियान व सूर्यनमस्कार या उपक्रमांचा आढावा घेण्याच्या निमित्ताने प्राथमिकचे शिक्षणाधिकारी (Primary Education Officer) डॉ. किरण लोहार (Dr. Kiran Lohar) हे शनिवारी (ता. 8) मंगळवेढा (Mangalwedha) दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या गणेशवाडी शाळेला भेट दिली. त्यावेळी पाचपैकी एक शिक्षक (Teacher) गैरहजर तर चार शिक्षकांकडे दैनंदिन टाचण नसल्याची बाब समोर आली. त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. (Education officials take action against teachers of Ganeshwadi Primary School)

हेही वाचा: मकर संक्रांतीपूर्वी शाळा होणार बंद? 7 दिवसांत वाढले दीड लाख रुग्ण

कोरोनाचा (Covid-19) राज्यभर संसर्ग वाढत असतानाही सोलापूर शहर- जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी सुरक्षितपणे शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swamy), शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर (Bhaskarrao Babar), प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्यातून शाळा सुरळीत सुरू आहेत. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी मंगळवेढ्यातील गणेशवाडी शाळेतील मुलांशी संवाद साधला. त्यावेळी सर्व मुले शाळेच्या मैदानात खेळत असल्याचे निदर्शनास आले. शाळेत एकूण पाच शिक्षक कार्यरत असतात. त्यापैकी चार शिक्षक हे शालेय कामकाजासाठी उपस्थित हाते. एक शिक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. संबंधित शिक्षकावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, उपस्थित असलेल्या चार शिक्षकांकडे दैनंदिन टाचण नव्हते. त्याबद्दल त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. शाळेत एकूण पटसंख्येच्या 80 टक्‍के विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याचा अनुभव त्यांना आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना कोविड प्रादुर्भाव परिस्थिती लक्षात घेऊन मास्क (Mask) वापरणे, सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर करा, गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, अशा सूचना केल्या.

हेही वाचा: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयात निघाली मोठी भरती

ठळक बाबी...

  • प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी आज (शनिवारी) दिली गणेशवाडी (ता. मंगळवेढा) शाळेला भेट

  • विद्यार्थ्यांशी साधला संवाद; पाचपैकी चार शिक्षकांकडे नव्हते अध्यापनाचे टाचण

  • टाचण नसताना शिकवले काय, यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

  • गणेशवाडी शाळेतील पाचपैकी एक शिक्षक होते गैरहजर; त्यांच्यावरही होणार कारवाई

  • शिक्षकांकडे अध्यापनाचे दैनंदिन टाचण असणे बंधनकारक; नसलेल्यांवर कारवाई अटळ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top