esakal | पालकमंत्र्यांनी सांगूनही आठ टेस्ट कमीच! आज 78 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

3Copy_20of_20coronavirus_test_20positive_21.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील 75 हजार 505 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील 67 हजार 588 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह 
  • शहरात आतापर्यंत आढळले सात हजार 902 रुग्ण 
  • आज 469 संशयितांमध्ये 78 जण पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू 
  • शहरातील मृतांची संख्या आता 457; सहा हजार 527 रुग्णांची कोरोनावर मात 

पालकमंत्र्यांनी सांगूनही आठ टेस्ट कमीच! आज 78 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने टेस्टची संख्या वाढवा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. 19) प्रशासनाला दिले. मात्र, शनिवारी 477 संशयितांची टेस्ट झाली होती, तर आज (रविवारी) 469 संशयितांचीच टेस्ट केल्याचे स्पष्ट झाले. त्यात 78 पॉझिटिव्ह सापडले असून हत्तुरे वस्तीतील 72 वर्षीय महिला, विजयपूर रोडवरील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरुष आणि सावली सोसायटी (इंदिरा नगर) येथील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

शहरात आज होमकर नगर (भवानी पेठ), आदित्य नगर, इंदिरा नगर, डीसीसी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, देशमुख नगर, सुंदरम नगर (विजापूर रोड), शेळगी, मल्लिकार्जुन नगर, गुरुनानक नगर, मुरारजी पेठ, पाने सोसायटी, बेगम पेठ, सुशिल नगर, भवानी पेठ, कलासंगम अपार्टमेंट, आकाश नगर, गणेश नगर (बाळे), चौगुले पार्क, शंकर नगर (होटगी रोड), सहवास नगर, सिटीझन पार्क, करुणा सोसायटी, महालक्ष्मी नगर (मजरेवाडी), सिध्देश्‍वर नगर (नई जिंदगी), गायत्री नगर, पीडब्ल्यूडी क्‍वार्टर (सिव्हिल लाईन), उत्तर कसबा, बिलाल नगर, मुद्रासन सिटी, गीता नगर, अरविंदधाम (निराळे वस्ती), मंत्री चंडक नगर, रेल्वे लाईन, शेटे नगर, सिध्देश्‍वर नगर, शिवयोगी नगर, दत्त नगर (जुळे सोलापूर), पश्‍चिम मंगळवार पेठ, जोशी गल्ली, पद्मा नगर, जोशी गल्ली, गोल्डफिंच पेठ, उमा नगरी, रविवार पेठ, दक्षिण बसका, जोडभावी पेठ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 75 हजार 505 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील 67 हजार 588 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह 
  • शहरात आतापर्यंत आढळले सात हजार 902 रुग्ण 
  • आज 469 संशयितांमध्ये 78 जण पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू 
  • शहरातील मृतांची संख्या आता 457; सहा हजार 527 रुग्णांची कोरोनावर मात 

को- मॉर्बिडच्या सर्व्हेबाबत संशय 
मार्चनंतर राज्यभरात लागू केलेल्या 72 दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या हेतूने दहा दिवसांचा कडक लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतर कमी झालेली रुग्णसंख्या आता हळूहळू पुन्हा वाढू लागली आहे. एकूण टेस्टच्या सरासरी 13 ते 16 टक्‍के रुग्ण आढळत आहेत. तरीही टेस्टची संख्या वाढलेली नाही. महापालिकेने को-मॉर्बिड रुग्णांना कोरोनापासून दूर ठेवण्याच्या हेतूने स्वतंत्र सर्व्हे सुरु केल्याचे सांगण्यात येते. मात्र, मृतांमध्ये 60 वर्षांवरील व्यक्‍तींचाच समावेश असल्याने सर्व्हेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

loading image
go to top