पंढरपूर : पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीत होती, अगदी एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र, आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. अगदी दाऊदचा हस्तक असलेला सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजरला देखील भाजपमध्ये घेतले हे अति झाले.