
सोलापूर : पुढे ख्रिश्चन लोक गरिबांना पैसे देत असल्याचे आमिष दाखवून तीन अनोळखी तरुणांनी रामा लिंगप्पा वाघमोडे (वय ८२, सादेपूर, ता. दक्षिण सोलापूर) यांना सिव्हिल हॉस्पिटलजवळील जुन्या पोस्ट ऑफिसशेजारील बोळात नेले. रामा वाघमोडे यांना पुढे जायला सांगून दोघांनी त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र लंपास केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३०) सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडला आहे.