
Locals rescue elderly man from floodwaters inside mosque — humanity above religion.
Sakal
माढा: भूकंप, महापूर, महामारी व कोरोना यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मनुष्य हा जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकाला मदत करतो, हे आपण अनुभवले आहे. माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या महापुराच्यावेळी दारफळमध्येही जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन एका माणसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न झाला. दारफळमधील महापुरात मशिदीमध्ये अडकलेले सिकंदर सय्यद या ज्येष्ठ व्यक्तीला प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पोहत जात दारफळमधीलच सुरेश शिवाजी शिंदे या व्यक्तीने सुखरूप बाहेर काढले.