election
electionsakal

निवडणूक हालचालींमुळे सांगोल्यात पुन्हा तापू लागले राजकीय वातावरण

ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या निवडणुका न्यायालयाच्या निर्णयामुळे लवकर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यापासून थंडावलेले राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.
Summary

ओबीसी आरक्षणामुळे लांबलेल्या निवडणुका न्यायालयाच्या निर्णयामुळे लवकर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यापासून थंडावलेले राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.

सांगोला, जि. सोलापूर - ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) लांबलेल्या निवडणुका (Election) न्यायालयाच्या निर्णयामुळे लवकर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गेल्या काही महिन्यापासून थंडावलेले राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय हालचालींबरोबरच राजकीय वातावरण (Political Atmosphere) निर्माण होऊ लागले. सांगोला तालुक्यात (Sangola Tahsil) मतदारांच्या संपर्कापासून दुरावलेले इच्छुकांनी मतदाराजाचा पुन्हा संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे राज्य शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. परंतु न्यायालयाने सध्या या निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला काही सूचना केल्या आहेत. निवडणूक आयोगानेही निवडणुका घेण्यासंदर्भात नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया थांबली होती, तेथुन पुढे प्रक्रिया राबविण्यात संदर्भात सूचना आल्याचे बोलले जात आहे. या निवडणुका येत्या काही दिवसात घेतल्या जाणार असल्याने तालुक्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या राजकीय डावपेचांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसात केव्हांही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल या आशेने प्रत्येक निवडणुकीतील आपल्या पक्षाचे, गटाचे उमेदवार तयार ठेवून त्या प्रभागात जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने येणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अगोदरच काहीजणांनी नगरपालिकेत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपणच उमेदवार असू या आशेने अनेकांनी त्या प्रभागात, गटात कामे सुरू केली होती. परंतु त्यावेळी निवडणुका स्थगित झाल्याने जणसंपर्क तुटला होता. सध्या निवडणूकांचे वारे वाहू लागताच अनेकांनी पुन्हा जनसंपर्क वाढविला आहे.

राजकीय आघाड्या व युत्यांकडे लागले लक्ष -

पुन्हा निवडणुकीच्या हालचाली वाढू लागल्याने आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोण - कोणा बरोबर युती - आघाडी करतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. या अगोदरच नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी झाल्याची घोषित केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ही आघाडी अशीच राहते का ? तसेच शेकाप पक्ष दोन्ही निवडणुकांत भाजपसोबत युती करतो का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शेकाप व भाजप युतीबाबत सांगोला शहरात सध्या वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. शेकाप व भाजपच्या काही बड्या नेतेमंडळींनी एकमेकांचा संपर्क वाढविला आहे. तोच मित्रत्वाचा संपर्क निवडणुकीत दिसतो का हे पाहावे लागेल.

निवडणूका लागल्या वाटतं...

सध्या तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकांसाठी ग्रामीण भागातील अनेकजण एकत्रित येत आहेत. त्यातच तालुक्यातील सर्वाधिक सोसायट्या या बिनविरोध झाल्या आहेत. सोसायटी निवडणूकीसाठी गावातील सर्वपक्षीय एका हॉटेलमधील एकत्रित जमलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांने ही संधी साधून सर्वांना उन्हामुळे थंड पेयाची ऑर्डर दिली. गेल्या काही दिवसापासून संपर्कातही नसणाऱ्याने आज गावातील सर्वपक्षीय जमलेल्यांना थंडपेये सांगितले काहींनी आश्चर्य व्यक्त केले. त्यातील एकाने राहून ना राहून थंडपेय पित हसत म्हणाला की, निवडणुका लागल्या वाटतं..!

कोणतातरी स्वार्थ ठेवून, पैसे खर्च करुन निवडणुकांमध्ये उभा राहायचे. निवडून आला की पाच वर्षे जनहित न पाहता स्वतःचा स्वार्थ साधत बसायचे हे अनेकांचे धोरण असते. अशा स्वार्थी, ढोंगी उमेदवारांपासून मतदारांनी जागृत राहिले पाहिजे व निस्वार्थीपणे सतत सामाजिक कामांमध्ये पुढे असणाऱ्या लोकांना निवडणुकीत उभे करून निवडून आणले तरच समाजहित साधले जाईल.

- सांगोल्यातील एक सुज्ञ नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com