राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक अशक्‍य! गटातटात लढतीची शक्‍यता | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक अशक्‍य! गटातटात लढतीची शक्‍यता
राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक अशक्‍य! गटातटात लढतीची शक्‍यता

राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक अशक्‍य! गटातटात लढतीची शक्‍यता

sakal_logo
By
सुनील राऊत

नातेपुते (सोलापूर) : नातेपुते (Natepute) येथील राजकीय (Political) गट-तट लक्षात घेता, राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यावर तडजोड होईल, असे असे चित्र दिसत नाही. प्रत्येक जण आघाडीकडूनच आपला राजकीय सवतासुभा बाजूला ठेवून वेगळा गट करून निवडणूक लढवणार, हे निश्‍चित आहे. त्यामुळे येथील नगरपंचायत निवडणूक चुरशीत होणार हे निश्‍चित.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीवर 15 दिवस अत्याचार! बार्शीतील घटना; दोघांना अटक

नातेपुते नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, येत्या 21 डिसेंबर रोजी मतदान व 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, हे गृहीत धरून प्रत्येक गट आपापल्या पद्धतीने गट बांधणीच्या कामाला लागले होतेच. तरीही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात निवडणुका जाहीर होतील, असे सर्वानी गृहीत धरले होते. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगरपंचायतीच्या निवडणुका लढवाव्यात, असा आग्रह आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, धैर्यशील मोहिते- पाटील यांचा आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांनीही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

नातेपुते शहरात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी पोलिस पाटील राजेंद्र पाटील, माजी सरपंच ऍड. भानुदास राऊत, चंद्रशेखर भांड, कै. रघुनाथ उराडे, रघुनाथ कवितके, कै. सुरेश ठोंबरे असे राजकीय गट आहेत. यापूर्वी माजी सरपंच ऍड. भानुदास राऊत, माजी पोलिस पाटील राजेंद्र पाटील, कै. रघुनाथ उराडे, कै.रामचंद्र भांड या चौघांचा एक पॅनेल पूर्वी असे. 2020 च्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वरील सर्व राजकीय समीकरणे बदलून गट बांधणी नव्याने झाली होती. यामध्ये बाबाराजे देशमुख, राजेंद्र पाटील यांचे चिरंजीव माजी उपसरपंच अतुल पाटील, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, संदीप ठोंबरे आणि अजय भांड, कै. रघुनाथ उराडे यांचे चिरंजीव विजय व भारत, अहिल्यादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कवितके यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक एकत्र लढवली होती. आणि 17-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता.

या निवडणुकीत ऍड. भानुदास राऊत यांनी बहुतेक जागा लढून आपले अस्तित्व दाखवून दिले होते. अनेक ठिकाणी अल्प मतांनी त्यांचे उमेदवार पराभूत झाले होते. नगरपंचायत होण्याचा पहिला ठराव ऍड. भानुदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. येणाऱ्या निवडणुकीत भाजप चिन्हावर निवडणूक लढवायची म्हटले तर ऍड. भानुदास राऊत यांच्या गटाची तयारी आहे. परंतु बाबाराजे देशमुख यांच्या गटांमध्ये समाविष्ट असणाऱ्या अनेक नेत्यांना पक्षाच्या चिन्हावर लढण्याची मानसिकता दिसून येत नाही. तरीही शिवरत्न बंगल्यावरून काही विशेष तडजोडी झाल्या तर नातेपुते नगरपंचायतीची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होऊ शकते.

याउलट नगरपंचायतची पहिलीच निवडणूक असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांस वाटते की माझ्या प्रभागात माझेच राजकीय आणि जातीचे वर्चस्व आहे, त्यामुळे बिनविरोधचा प्रयत्न यशस्वी होईल, असे वाटत नाही. नवीन झालेल्या प्रभाग रचनेत 17 प्रभाग निर्माण झाले आहेत. पूर्वी ग्रामपंचायतीच्या वेळी सहा प्रभाग व 17 सदस्य होते. आता एका प्रभागात एकच सदस्य असणार आहे. त्यामुळे प्रभाग आवाक्‍यात आला, असे चित्र आहे. हक्कांची 200 मते असतील तर नगरसेवक होऊ शकतो, असे चित्र अनेकांनी रंगविले असल्याने अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. राजकीय पक्षाकडून किंवा आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यास अनेक जण अपक्ष लढण्याची तयारी करीत आहेत.

हेही वाचा: सोलापूरकरांना पडला 'एसएमएस'चा विसर! कोरोनाला आमंत्रण देण्याचाच प्रकार

ठळक मुद्दे...

  • शहरातील तरुणांना एकत्र करून आघाडी स्थापन करून आम्ही ही निवडणूक लढविणार : बाबाराजे देशमुख

  • मोहिते-पाटील यांनी मनात आणले तर तालुक्‍यातील श्रीपूर-महाळुंग, माळशिरस, नातेपुते या नगरपंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर होऊ शकतात, अन्यथा नाही

  • उत्तमराव जानकर यांनी मनात आणले तर तिन्ही नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडी होऊ शकते

  • डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष

loading image
go to top