
सोलापूर: वीजपुरवठा खंडीत न केल्याने आणि सुरक्षा साधने न पुरवल्यामुळे विजेचा धक्का बसून कंत्राटी कामगार जखमी झाल्याप्रकरणी महावितरणच्या शाखा अभियंत्यासह तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तंत्रज्ञ पिराजी माने, वैजनाथ उदगीरे व शाखा अभियंता भास्कर मुदलियार यांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे.