esakal | Big Breaking ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर गुन्हा दाखल 
sakal

बोलून बातमी शोधा

Eleven to twelve hundred people including Prakash Ambedkar have been Filed a crime

संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या अकराशे ते बाराशे लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Big Breaking ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर गुन्हा दाखल 

sakal_logo
By
अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाउनच्या प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून, मास्क न घालता, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. 
श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे या मागणीसाठी ऍड आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी येथे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आदेश पारित केलेला आहे. असे असताना देखील या आंदोलनाच्या वेळी जमाव गोळा झाला होता. श्री. आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे (रा.मुक्ताबाई मठ, पंढरपूर), आनंद चंदनशिवे (रा. सोलापूर), धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, नाम महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड (रा. पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे (रा.अकोला), माऊली हळणवर (रा. इश्वरवठार, ता.पंढरपूर) आणि इतर अकराशे ते बाराशे जणांनी मास्क न घालता, सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही. त्याची दखल घेऊन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्सेटबल परशुराम माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सहायक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड तपास करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

loading image