
सोलापूर : पत्नी अपमानास्पद वागणूक देते, चारचौघात शिवीगाळ करून घालूनपाडून बोलते, सतत मानसिक त्रास देते म्हणून आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याने घटस्फोटासाठी सोलापूर कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. दोघेही घटस्फोटावर ठाम असल्याने न्यायालयाने त्या चिमुकल्याला कोणाकडे राहायला आवडेल, असे विचारले. त्यावेळी तो म्हणाला ‘मला आई-बाबा दोघेही हवेत, आजी-आजोबा पण पाहिजेत’. हे उत्तर ऐकून उपस्थित सगळेच गहिवरले आणि त्या पती-पत्नीने एकमेकांची माफी मागून एकत्र होण्याचा निर्णय घेतला.