

AIMIM chief Asaduddin Owaisi addresses a charged crowd during a high-voltage public rally.
Sakal
-प्रभुलिंग वारशेट्टी
सोलापूर : पानगल प्रशालेच्या मैदानावर मंगळवारी (ता. ६) झालेली एमआयएम पक्षाची सभा केवळ राजकीय भाषणबाजीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या चातुर्याची एक मोठी कसोटी ठरली. शहर मध्यचे एमआयएमचे विधानसभा उमेदवार राहिलेले नेते फारुख शाब्दी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रथमच होत असलेल्या खासदार ओवेसी यांच्या सभेत शाब्दींबद्दलच्या प्रेमाचा उद्रेक अश्रू व मागणीतून झाल्याचे पाहायला मिळाले.