
सोलापूर : विवाहाला काही दिवस झाल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विविध कारणांवरून छळ केल्याची फिर्याद अंजली मेघराज मिरजकर (रा. प्रसाद नगर, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली. तू व तुझे बाळ मला नको आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे. तुला माझ्याकडे नांदायचे असल्यास घर बांधायला माहेरून दहा लाख रुपये आण म्हणूनही त्यांनी त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.