
पंढरपूर : येथील विठ्ठल मंदिर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने भाविकांना याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय परप्रांतीय फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील या निमित्ताने समोर आला आहे. पोलिसांची कारवाई थंडावल्याने पुन्हा विठ्ठल मंदिर परिसरात अतिक्रमणे वाढू लागली आहेत. दरम्यान, पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विठ्ठल मंदिर पोलिसांनी थेट केराची टोपली दाखविल्याची चर्चा सुरू झाली आहे.