

Shekap’s 50-Year Control Ends in Sangola Panchayat Samiti; BJP–Shiv Sena Take Charge
sakal
सांगोला : तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत पं.स.वरील शेकाप जवळपास पन्नास वर्षांची सत्ता अखेर संपुष्टात आली आहे. तालुक्यात झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर महायुतीने पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली असून, भाजपच्या पूनम इंगवले यांची सभापतिपदी तर शिवसेनेचे अजय सरगर यांची उपसभापतिपदी निवड झाली आहे.