
Agriculture News
Sakal
सोलापूर : एकीकडे 15 मे पासून उत्तर सोलापूर तालुक्यात सतत धुवाधार पाऊस पडत आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे.यातच अकोलेकाटी येथील नामदेव माने या शेतकऱ्याला बँकेकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच सदर प्रकरण न्यायालयात दाखल केल्या असून न्यायालय मार्फत या शेतकऱ्याला या अस्मानी संकटातच गेल्या दोन दिवसांपूर्वीच वकिलामार्फत नोटीस दिली आहे. "सगळं पीक वाया गेलं रे... आता नोटीस आली मी काय करू " असे म्हणत शेतकरी धाय मोलकून रडत आहे. असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.