
मंगळवेढा :ऑक्सिजन मार्ग म्हणून नावारूपाला येत असलेल्या मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावरील बाजार समितीसमोरील बसथांब्याजवळील पन्नास फूट उंचीची दोन वडाची झाडे शुक्रवारी रात्री अज्ञातांकडून तोडण्यात आली. ऐन वारी काळात अशा प्रकारे झाडांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा घडा लावून दोषींना कडक शासन करण्याची मागणी वारी परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.