सोलापूर शहरातील रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणांची उभारणी 

fire safty.jpg
fire safty.jpg

सोलापूर ः रुग्णालय इमारतीमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रतिंबंधक यंत्रणा व त्यासोबत घटना घडल्यानंतर हानी कमीतकमी व्हावी, यासाठी प्रशिक्षित सुरक्षा कर्मचाऱ्यांची यंत्रणा आधुनिक पध्दतीने अग्नीरोधक यंत्रणा अलर्ट केले आहे. त्यामुळे सोलापुरातील रुग्णालयांनी सुरक्षा पध्दतीच्या गुणवत्तेचा मानदंड निर्माण केला आहे. शहरातील रुग्णालयांच्या मूळ वास्तू आराखड्यात सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या बाबी केल्या जातात. अग्नीरोधक वायरिंगचा उपयोग त्यापैकी महत्वाचे आहे. आग विझवण्यासाठी पाईपलाइनचे जाळे प्रत्येक वॉर्डात पोहोचवण्याचे काम करण्यात आले आहे. 

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील बाल रुग्णालये व मोठ्या हॉस्पिटलच्या फायर ऑडिटचा अंदाज घेतला असता, सुरक्षिततेची काळजी घेत असल्याचे बाब समोर आली आहे. हॉस्पिटलच्या बांधकामामध्ये आपतकालीन खिडकीची बांधणी करण्याची गरज असते. रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या महिलांना ईजा न होता त्या खिडक्‍या तोडता येतील, अशा ब्रेकेबल काचा बसविण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग सोलापूरच्या रुग्णालयात केला जात आहे. यासोबत आगीची घटना घडली, तर अलर्टनंतर करावयाच्या उपाययोजनाचे प्रशिक्षणदेखील कर्मचाऱ्यांना देणे आवश्‍यक आहे. अनेक रुग्णालयाद्वारे पुणे येथून काही कंपन्या इलेक्‍ट्रिकल ऑडिट व इन्स्ट्रूमेंटल ऑडिट नियमित करून देण्याची सेवा देतात. त्याचा उपयोग चांगल्या पध्दतीने केला जात आहे. 

सुरक्षेचे उपाय काय आहेत 
- बांधकामात प्रत्येक भागात जास्त दाबाने पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप व स्प्रिंकलर 
- अग्नीरोधक वायरिंग, फ्यूज कंट्रोल, स्मोक डिटेक्‍टर, अलार्मचा उपयोग 
- धूर बाहेर काढण्यासाठी ब्रेकेबल काचा व आपतकालीन खिडकी 
- इलेक्‍ट्रिकल व ईन्स्ट्रूमेंटल ऑडिट व चेकिंग 
- कमी अंतरावर स्मोक डिटेक्‍टर 
- आग विझवण्यासाठीची यंत्रसामुग्री प्रत्येक वॉर्डात 
- नवजात बालक वॉर्डात वार्मर सेंन्सरची तपासणी 
- महिला परिचारिकांना स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण 
- आयसीयूसारख्या बंदिस्त वॉर्डात थेट सर्व खिडक्‍या फोडून बाहेर पडण्याची सोय 

सुरक्षा ऑडिट महत्वाचे 
सर्व प्रकारच्या सुरक्षा व इलेक्‍ट्रिकल वस्तूंची सुरक्षा ऑडिट व त्यासाठी एनएनएफ (नॅशनल निओनेटल फोरम) सारख्या संस्थाकडून गुणवत्ता मानके दिली जातात. याप्रमाणे सुरक्षेचे उपाय केले जाऊ शकतात. 
- डॉ.अतुल कुलकर्णी, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, आश्‍विनी हॉस्पिटल, सोलापूर 


इमारत उभारणीपासून उपाययोजना 
इमारत उभारणीच्या वेळीच सुरक्षेचे अनेक उपाय निश्‍चितपणे ठरवले जाऊन कायमस्वरुपी सुरक्षा यंत्रणा उभारली जाऊ शकते. वायरिंगची गुणवत्ता बऱ्याच दुर्घटना टाळू शकतात. तसेच इतर सुरक्षा यंत्रणा व वापरण्याचे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. 
- डॉ. माणिक गुर्रम, अध्यक्ष, मार्कंडेय हॉस्पिटल, सोलापूर 


अनेक घटकांची देखभाल व सतर्कता 
वास्तू आराखड्यातील सुरक्षा तरतुदी, सुरक्षा यंत्रसामुग्रीची नियमित देखभाल, सुरक्षा प्रशिक्षण, इलेक्‍ट्रिकल वस्तूंची देखभाल यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश करून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कार्य करु शकते. 
-समीर इनामदार, व्यवस्थापक, फॅसिलिटी सेफ्टी, आश्‍विनी हॉस्पिटल, सोलापूर 

हायड्रंट यंत्रणा प्रभावी 
आम्ही रुग्णालयात सर्व प्रकारच्या हायड्रंट, स्मोक डिटेक्‍टर सारख्या यंत्रणा बसवल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना देखील नियमितपणे या सुरक्षेच्या संदर्भात हवे असणारे नियमित प्रशिक्षण देखील दिले जाते. 
- चेतन नागराशी, प्रशासकीय अधिकारी, स्पॅन बालरुग्णालय, सोलापूर  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com