कोरोनाच्या संकटातही जगाचा पोशिंदा दिवसरात्र राबतोय शेतात 

Even in the Corona crisis the farmar lives in the fields day and night
Even in the Corona crisis the farmar lives in the fields day and night

करमाळा (जि. सोलापूर) : कोरोना व्हायरसने सध्या सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकार प्रत्येकाला घरातच बसा, बाहेर पडू नका, असे आवाहन करत आहे. त्याला अपवाद वगळता नागरिकही प्रतिसाद देत आहेत. एकीकडे शहरातील नागरिकांनी घरात कोंडून घेतले आहे. अशा स्थितीत मात्र जगाचा पोशिंदा दिवसरात्र शेतात राबताना दिसत आहे. 
ग्रामीण भागात भविष्याचा विचार करून शेतकरी उन्हात शेतीची मशागत करत आहे. महिनाभरात पाऊस पडेल या आशेने शेतकरी पुढचे पीक घेण्यासाठी नांगरणे, काकरणे, पाळी घालणे, शेणखत शेतात टाकणे आदी कामे करत आहेत. 
कोरोनामुळे यावर्षी शेतातील कलिंगड, खरबूज, केळी जनावरांना टाकावी लागली. कांदा दोन रुपये ते पाच रुपये किलो एवढ्या कमी भावात द्यावा लागला. डाळिंब, लिंबू कवडीमोल भावात विकत आहे. अक्षरशः शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघाला नाही. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात खर्च केला ते शेतकरी अडचणीत आले आहेत. तरीही जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पुन्हा एकदा लॉकडाउन संपल्यानंतर माझ्या पिकाला भाव मिळेल, असा आशावाद जिवंत ठेवत भर उन्हात शेतात राबताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे महिनाभरापासून महाराष्ट्रातील उद्योग ठप्प झाले आहेत. अत्यावश्‍यक सेवेसह शेतीमाल विक्रीला परवानगी दिली असली तरी नागरिकांच्या मनात भीती असल्याने ते बाहेर पडत नाहीत. ग्रामीण भागातही सध्या कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. 
कोरोनावर अद्याप उपचार नसल्याने एकमेकांच्या संपर्कात नाही आले तरच त्याला रोखणे शक्‍य आहे. शहरी भागातील उद्योगधंदे बंद असल्याने मोठा आर्थिक परिणाम होत आहे. शेतीवर तर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. तरीही शेतीची वेळीच मशागत झाली नाही तर शेतकऱ्यांचे जगणे अवघड होते. कारण शेतीची मशागत वेळीच झाली नाही शेतमाल पिकवू शकणार नाही, ही भावना ठेवून शेतकरी सध्या कामाला लागले आहेत. जूनमध्ये पावसाळा सुरू झाला की, पेरणी करण्यासाठी आपली शेती तयार पाहिजे या भावनेतून शेतकरी लॉकडाउनमध्येही राबतो आहे. 

तर पुढच्यावर्षी कसं व्हायचं? 
यावर्षी कोरोनामुळे कसलंचं उत्पन्न मिळाले नाही. आता पुढच्या वर्षी शेतीमालाला चांगला भाव मिळेल असे वाटते. त्यामुळे शेतीची लेवल केली आहे. आता शेणखत घालायचे, लगेच नांगरट करून घ्यायची. आता कोरोना गेला पाहिजे नाही तर लय अवघड होणार आहे. कोरोना म्हणून घरात बसून राहिलो तर पुढच्यावर्षी कसं व्हायचं? 
- अश्रू पाडुळे, शेतकरी, उमरड, ता. करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com