नवीन कांद्यालाही मिळेना चांगला भाव! प्रतिक्विंटल २३०० रुपयांचाच दर

कांद्याला तीन हजारांहून अधिक दर अपेक्षित होता; पण सोलापूर, नाशिकसह सर्वच बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे दर गडगडले आहेत. दक्षिण भारतात अवकाळी पाऊस सुरू असल्याने मागणी घटली आहे. सध्या नवीन कांद्याला सर्वाधिक २३०० रुपयांपर्यंतच (प्रतिक्विंटल) दर मिळत आहे.
KANDA
KANDAsakal
Updated on

सोलापूर : अतिवृष्टीने विलंबाने लावलेला कांदा आता बाजारात येऊ लागला आहे. शेतकऱ्यांना कांद्याला तीन हजारांहून अधिक दर अपेक्षित होता; पण सोलापूर, नाशिकसह सर्वच बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे दर गडगडले आहेत. दक्षिण भारतात अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांद्याची मागणी घटली आहे. सध्या नवीन कांद्याला सर्वाधिक २३०० रुपयांपर्यंतच (प्रतिक्विंटल) दर मिळत आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ व कर्नाटक या राज्यांमध्ये जातो. पण, सध्या दक्षिण भारतातील काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे कांद्याची मागणी घटली असल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विभागप्रमुख विनोद पाटील यांनी दिली. पांढरा कांदाच सध्या बाजारात आलेला नाही. सध्या बाजारात नवीन कांदा ३० टक्के तर जुना कांदा ७० टक्के आहे. पुणे, बीड, उस्मानाबाद, सोलापूर येथून नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे कांदा लागवड लांबली होती आणि त्यात जुना कांदा खराब झाल्याचा अंदाज होता. त्यामुळे नवीन कांदा डिसेंबरमध्ये बाजारात आल्यावर तीन हजारांहून अधिक दर मिळेल, असा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण, तीन हजारांपर्यंत असलेला दर आता अडीच हजारांपेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कांद्याचे प्रतिक्विंटल दर

  • नवीन कांदा

  • सर्वाधिक २,३७५ रुपये

  • जुना कांदा

  • १,८०० ते २,२००

  • सरासरी दर

  • १,२००

  • किमान दर

  • १०० रुपये

ढगाळ वातावरणामुळे आवक कमी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता. १२) काही ठिकाणी थोडासा अवकाळी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी कांदा काढणी लांबणीवर ढकलली आहे. सोलापूर बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) १८२ गाड्या कांद्याची आवक होती. त्यावेळी सर्वाधिक दर २३०० रुपये तर सरासरी दर १२०० रुपये होता. मागील १५ दिवसांत कांद्याचे दर कमी-कमी होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे काही दिवसांत आणखी दर वाढतील म्हणूनही शेतकरी कांदा उशिराने काढणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com