शहर-जिल्ह्यात उद्यापासून मेडिकल, बॅंकांशिवाय सर्वकाही बंद !

सोलापूर शहर व जिल्ह्यात उद्यापासून मेडिकल, बॅंकांशिवाय सर्वकाही बंद
Lockdown
LockdownEsakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक उपाययोजना करूनही कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने शनिवारी (ता. 8) रात्री आठ वाजल्यापासून ते 15 मे रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाउन (Lockdown) करण्याचा निर्णय घेतला आहे. (Everything except medical and banks will be closed in Solapur city and district from tomorrow)

या कालावधीत मेडिकल, बॅंका, वर्तमानपत्रे या अत्यावश्‍यक सेवा वगळता किराणा, भाजीपाला, दूध विक्री या सेवा बंद राहणार आहेत. दूध विक्री ही केवळ घरपोच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Lockdown
गुरुवारी कोरोनामुळे 53 जणांचा मृत्यू ! एकाच दिवशी आढळले 2117 नवे रुग्ण

सध्या दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू असलेली सर्व किराणा दुकाने, बाजार समितीतील शेतमालांचे लिलाव, भाजीपाला विक्री, दुकानातून दूध विक्री व अन्य सेवा बंद राहणार आहेत. मटण, चिकन व अंडी विक्रीही बंदच ठेवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बॅंका मात्र सुरू राहणार आहेत. तसेच शेतीशी निगडित खते, बी-बियाणे, अवजारे आदींची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील. ई-पास असणाऱ्यांना घरपोच दूध विक्री करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोव्हिड लसीकरणासाठी जाण्यास नागरिकांना मुभा देण्यात येणार आहे. परंतु, आधार कार्ड किंवा ओळखीचा अन्य पुरावा सोबत न्यावा लागणार आहे.

कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अचानक सर्वच सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता केवळ शुक्रवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच नागरिकांना खरेदीसाठी वेळ मिळणार आहे. शनिवारपासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी नवीन निर्बंध लागू केले आहेत. याचा सविस्तर आदेश (शुक्रवारी) काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्याधिकारी शीतलकुमार जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com